जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर शुक्रवारीच ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २० जणांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ५४३ वर गेली असून, आजवर ३६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार १२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव १, तर बदनापूर तालुक्यातील साखरवाडी १, बावणे पांगरी येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील सावंगी १, तर भोकरदन तालुक्यातील चिंचोली येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात १९ हजार ७०९ जण संशयित आहेत. शुक्रवारी ७५० जणांच्या लाळेची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.