लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बुधवारी भाजपाचे प्रदीप विक्रम साबळे हे दहा मते मिळवत विजयी झाले. तर उपनगराध्यक्षपदी शेख युनुस शेख लालमिया यांची निवड झाली. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला बहुमत असतानाही दोन्ही पदे गमवावी लागली.नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्यावतीने प्रिती प्रमोद साबळे व भाजपाकडून प्रदीप विक्रम साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडीसाठी प्रत्यक्ष हात वर करून मतदान घेण्यात आले. प्रदीप साबळे यांना दहा व प्रिती साबळे यांना सात मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी प्रदीप साबळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे राजेंद्र जैस्वाल व शेख युनूस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असता, राजेंद्र जैस्वाल यांना सात व शेख युनुस यांना दहा मते मिळाली. निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, सी. एल. पवार, गणेश सुरवसे आदींनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन बारी व पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून शहरात मिरवणूक काढली. यावेळी आ. नारायण कुचे, देविदास कुचे, जिल्हा परिषद सदस्य अवधुत खडके, भगवानसिंग तोडावत, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे, वसंत जगताप, पद्माकर जºहाड, बद्रीनाथ पठाडे, अनिल कोलते, तात्यासाहेब मात्रे, महेश लड्डा, नगरसेवक संतोष पवार, सत्यनारायण गेल्डा, गोरखनाथ खैरे, विलास जºहाड ,बाबासाहेब क-हाळे, अनिल हिवराळे संदीप पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आघाडी असताना दोन्ही पदे गमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:03 AM