"फोर्ड गाडी घेतली, कंपनी गेली; टोयोटा घेतली, उद्धव ठाकरे घरी गेले; गोरंट्याल यांचा खोतकरांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:23 AM2023-01-19T00:23:47+5:302023-01-19T00:26:46+5:30
पत्रकार परिषदेत गोरंट्याल यांनी किरण खरात, झोल आणि खोतकर कुटुंबातील सदस्य टूरवर गेल्याचे फोटोही पत्रकारांना दिले...
एकीकडे खोतकर, हे उद्योजक किरण खरात याच्याकडून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतलेले पैसे गुंतवणूकदार आणि शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी करतात, मात्र दुसरीकडे याच किरण खरातने वर्षांतून 3वेळा आयोजित केलेल्या टूरची मजा घेत मज्जा करतात. असा आरोप काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत गोरंट्याल यांनी किरण खरात, झोल आणि खोतकर कुटुंबातील सदस्य टूरवर गेल्याचे फोटोही पत्रकारांना दिले. मी क्रिप्टो करन्सी प्रकरणात कुणाच्याही पाठीशी नसून, माझी बिनधास्त चौकशी करा, असेही गोरंट्याल यावेळी म्हणाले. खोतकर कुटुंबियांचा पायगुण खराब असून यांनी फोर्डची गाडी आणली त्या दिवशी फोर्ड कंपनी भारताबाहेर गेली. ज्या दिवशी यांनी फॉर्च्युनर गाडी आणली त्यादिवशी उद्धव ठाकरे घरी गेले, असा आरोपही गोरंट्याल यांनी केला आहे. माझ्या कुटुंबाबाबत काही आरोप कराल तर जे तुमचं लोकांना माहीत आहे. ते मला माहित आहेच. पण जे लोकांना माहित नाही तेही मला माहित आहे. असेही गोरंट्याल यांनी म्हंटले आहे.
खोतकर कुटुंबियांचा पायगुण खराब आहे. यांनी फोर्डची गाडी आणली त्या दिवशी फोर्ड कंपनी भारताबाहेर गेली. फॉर्च्युनर गाडी आणली त्यादिवशी उद्धव ठाकरे घरी गेले, असा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे.#KailasGorantyal#Politicspic.twitter.com/FLkSa0xzQK
— Lokmat (@lokmat) January 18, 2023
मी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत नाही, तुम्ही किरण खरात याच्या विरोधात कोर्टात किंवा पोलीस ठाण्यात का गेले नाही? त्यांच्या घरात घुसून बंदूक का लावली, असा सवालही गोरंट्याल यांनी उपस्थित केला. 'सिर्फ खंजर ही नही आँखो मे पाणी चाहीये, ये खुदा इसके बाद मुझे दुश्मन भी खानदानी चाहीये,' असा टोलाही गोरंट्याल यांनी यावेळी लगावला लगावला.