जालना : लोकमत सखी मंचच्या वतीने ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळेचे आयोजन २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.मधूर बॅक्वेट, मिशन हॉस्पिटलच्या मागे, दुर्गामाता रोड जालना येथे होणा-या या स्पर्धा व कार्यशाळेत सहभागासाठी ५०० रुपये शुल्क असून, सखीमंच सदस्यांसाठी प्रवेश मोफत राहणार आहे. ब्रायडल मेकअप स्पर्धेसाठी मॉडेल स्वत: आणावी लागणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रवेशासाठी सखी मंच २०१८ चे ओळखपत्र आवश्यक आहे.हर्षा अॅण्ड संजय हे या कार्यक्रमाचे नॉलेज पार्टनर आहेत. ते ब्रायडल मेकअपचे प्रात्यक्षिक व सौंदर्यविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी मधूर बॅक्वेट हे व्हेन्यू पार्टनर आहेत. अधिक माहितीसाठी व नावनोंदीसाठी ९०७५०९८०३६ या क्रमांकावर स. ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क साधावा.
ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:39 AM