लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बांधकाम व्यावसायिक शंकर शर्मा यांचे अपहरण करणाऱ्या यासीन राठोडच्या घर, कार्यालयाच्या झडती सदर बाजार पोलिसांनी गुरूवारी घेतली. यात शर्मा यांना दिलेल्या झोपेच्या गोळ्यांची दोन पाकिटे पोलिसांनी जप्त केली आहेत. या गोळ्या आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.शंकर शर्मा यांच्या अपहरणामूळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. राठोड आणि शर्मा यांचे तसे जुने संबंध होते, त्यांच्या पैशाचे व्यवहारही होत असत, यातून शेती तसेच अन्य व्यावसायिक उलाढालीतून राठोर यांना जीएसटी विभागाकडून ५३ लाख रूपये भरण्याची नोटीस मिळाल्याने ते हादरले आहेत. ही नोटीस पाठविण्या मागे शंकर शर्मा यांचा हात असावा अशी शंका त्यांनी घेतली. त्यातूनच हे अपरहण नाट्य रंगल्याचे दिसून आले.दरम्यान गुरूवारी राठोर यांच्या एमआयडीसीतील घर आणि कार्यालयाची झडती सदर बाजार पोलिसांच्या पथकाने घेतली. यावेळी त्यांना झोप येण्यासाठी लागणा-या गोळ्यांचे दोन पाकिट आढळून आले. ही पाकिट पोलिसांनी जप्त केली असून, ती लगेचच न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविणार असल्याचे देशमुख म्हणाले. जीएसटी प्रकरणाच्या नोटीस बद्दलही आम्ही जालना येथील जीएसटी कार्यालयाशी संपर्क करून त्यातील तथ्य जाणून घेणार आहोत. तसेच जीएसटीचे ५३ लाख रूपये राठोरकडे कसे निघाले आणि त्याचे स्त्रोत कोणते हे देखील तपासणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासीन राठोड याला न्यायालयात हजर केले असता, त्याला २५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.षङयंत्र : बीड, नगर मार्गे शेंद्रा येथे आणलेशर्मा हे मंगळवारी सकाळी घरातून गेल्यावर त्यांची राठोर यांच्याशी भेट झाली. राठोर याने शर्मा यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिल्याचे मान्य केले आहे. तसेच शर्मा हे या गुंगीच्या औषधामूळे ते बेशुध्द पडले. त्यावेळी शर्मा यांना राठोडच्या चालकाने प्रथम बीड तसेच नंतर नगर आणि नगरहून शेंद्रा येथील एमआयडीच्या गोदामात आणून डांबून ठेवले. जर पोलिसांनी शर्मा यांचा शोध तातडीने लावला नसता, तर शर्मांची प्रकृती आणखी खालावली असती असेही पोलिसांनी सांगितले.
राठोडच्या कार्यालयातून गोळ्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:09 AM