भोकरदन/आन्वा : तालुक्यातील कल्याणी आणि वाकडी गावाच्या शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने एक बैल व तीन शेळ्यांचा फडशा पाडला. यात शेतकऱ्यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे़शुक्रवारी सायंकाळी शेतकरी लयणोसिंग बसवराज मुराडे यांनी आपल्या शेतातील गट क्र. २८९ मध्ये घराच्या शेजारीच असलेल्या झाडाखाली बैलाला चारा - पाणी करून बांधले होते. मात्र रात्री दोन ते तीनच्या दरम्यान बिबट्याने या ठिकाणी येऊन बैलावर हल्ला केला. यात बैल मरण पावला. त्यानंतर त्या ठिकाणाहून बिबट्या पळून गेला. त्याने या घटनास्थळाच्या दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या वाकडी शिवारातील सुनील पांडळे यांच्या गोठ्यातील तीन शेळ््यांची शिकार केली. हा प्रकार दोन्ही शेतकऱ्यांना शनिवारी सकाळी समजला.
बिबट्याने पाडला बैल, शेळ््यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:10 AM