लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कन्हैयानगर परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांत निवडणुकीच्या जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात तलवारी, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.सैय्यद अजहर सैय्यद समद हे त्यांच्या मित्रांसह कारमधून घरी जात असताना त्यांची कार अडवून त्याना रमेश भगत, नितीन भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. ही माहिती परिसरात परसरताच सैय्यद समद यांचे समर्थक घटनास्थळी पोहचले. यामुळे दोन्ही गटात फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. त्यात सैय्यद समद हे जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने एकमेकांविरूध्द प्रचंड दगडफेकही केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बोर्डे, सहायक निरीक्षक मेंगडे यांनी तातडीने घटनास्थही धाव घेऊन जमावाला नियंत्रणात आणले. यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.सैय्यद समद हे काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेचा पती असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी झालेल्या जालना पालिकेच्या निवडणुकीतील वादातून हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा कायास आहे. या हाणामारी प्रकरणात सैय्यद समद व आणि नितीन भगत यांनी परस्पर विरोधात दिलेल्या तक्रावरीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात २९ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना : आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडीयावेळी ७० ते ८० जणांचा जमाव होता. यात अनेकांकडे काठी, लोखंडी रॉड तसेच लोखंडी सळ्या होत्या. ज्या की, पोलिसांनी हस्तगत केल्या. एकूणच या रात्री झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांनी सोमवारी सकाळी धरपकड करून २९ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २७ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी दिली.
दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:21 AM