लोकमत न्यूज नेटवर्कउस्वद : मंठा तालुक्यातील उस्वद, किर्तापूर, नळडोळ, पेवार, अंधवाडी आदी गावातील विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी बसची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना सात कि़मी. पायी चालून शाळा गाठावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.शिक्षणात मुलींचा टक्का वाढवा यासाठी शासनाने विविध सुविधा दिल्या आहेत. यासाठी मोफत सायकल वाटप असो वा ग्रामीण भागात मानव विकासची बस सुरु करुन विद्यार्थीनींसाठी सोय केली आहे. मात्र बसची कमतरता असल्याचे कारण देत उस्वद, किर्तापूर, नळडोळ, पेवार, अंधवाडी गावात मानव विकासची बस गेल्या काही महिन्यापासून येतच नसल्याने विद्यार्थींनींना पायपीट करावी लागत आहे. बस नसल्याने विद्यार्थींनींना खाजगी वाहनाने दाटीने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.विद्यार्थिंनींची तारांबळ उडत आहे आहे.याबाबत परतूर आगाराकडे तक्रारी करुनही याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने पालकांमध्ये संताप आहे.याकडे एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी लक्ष देऊन परिसरात मानव विकासची बस सुरु करण्याची मागणी विद्यार्थीनीं, पालकांनी केली आहे.
बसअभावी विद्यार्थिनींची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:06 AM