लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने मुगाला ६ हजार ९७५ रूपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. मात्र शासनाने अद्यापही हमीभाव केंद्र सुरु केले नाही. परिणामी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा तब्बल एक हजार ते एक हजार २०० रूपये कमी भावाने मूग विकावा लागत असल्याने शेतक-यांत संताप आहे.यंदा चांगला पाऊस पडले या आशेवर जिल्ह्यात मूग, उडीद आदी कडधान्याचा पेºयात वाढ झाली होती. सुरुवातीच्या पावसाने मुगाचे पीक सुध्दा जोमात होती. मात्र ऐन शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने हुलकावणी दिल्याने पिकाला फटका बसला. परिणामी मुगाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. १५ आॅगस्ट पासून कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक सुरु झाली आहे. जालना, भोकदन तालुक्यासह विदर्भातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा आदी परिसरातून मुगाची आवक होत आहे.बुधवारी २ हजार ५०० क्विंटलची आवक बाजारात झाली. बेभवरशाच्या शेती व्यवसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यात संताप आहे. परिणामी शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडत आहे. यामुळे शासनाने तूर, हरभºयापाठोपाठ मुगाला आधारभूत किंमत जाहीर केली आहे.६ हजार ९७५ रूपये प्रती क्विंटल मूग खरेदी करण्याच्या सूचना आहेत. मात्र याकडे व्यापा-याकडून कानाडोळा करण्यात येत आहे. बाजार समितीत ५ हजार ७७५ ते ६ हजार पर्यंत मुगाची खरेदी करण्यात येत आहे.यामुळे शेतक-यांना तब्बल ११०० ते १२०० रुपयांचा क्विंटलमागे नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकºयांत संताप आहे.हमीभाव केंद्राची घोषणा हवेतचपणन राज्यमंत्री सुभाष देशमुख यांनी मूग, उडीद खरेदीसाठी शेतक-यांची आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आदेश चार दिवसापूर्वीच दिले होते. मात्र अद्यापही नोंदणी सुरु न झाल्याने शेतक-यांना हमीभावापेक्षा तब्बल ११०० ते १२०० कमी दराने मुगाची विक्री करावी लागत आहे.शेतक-यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.दरम्यान एक आक्टोबर पासून हे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतील असे सांगण्यात आले.मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारआधीच शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतमालाला हमीभाव मिळावा हा त्यांचा हक्क आहे.यामुळे हमीभाव केंद्र सुरु करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. -अर्र्जुन खोतकर, राज्यमंत्री तथा सभापती
हमीभावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:11 AM