लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याच्या विरोधात देशपातळीवर आंदोलन उभे राहिले असून, सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सामाजिक समतोल कायम राखण्यासाठी आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने तात्काळ हा कायदा मागे घ्यावा, असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जमाते ए इस्लामी हिंद, अहेले सुन्नतुल जमात मुस्लिम लीग, पीआरपी कवाडे, समस्त ओबीसी समाज, ख्रिश्चन डेमोक्रॅटिक फ्रंट, मिल्लत बचाव तहेरीक इ. संघटनांच्या वतीने सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याविरुध्द, केंद्र शासनाच्या धोरणांविरूध्द शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आ. गोरंट्याल बोलत होते.आ. गोरंट्याल म्हणाले, केंद्र शासन देशातील मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी सीएए सारखा कायदा लागू करुन बेरोजगारांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करीत आहे. वास्तविक पाहता केंद्र शासनाला सुशिक्षित बेरोजगारांचे आणि शेतकरी, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. उलट या घटकांवर अन्याय करायचा आहे आणि भांडवलदारांची पाठराखण करायची असल्यामुळे केंद्र शासन देशात होत असलेल्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून जोपर्यंत हा कायदा केंद्र शासन मागे घेणार नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्षांसह विविध समाजसंघटनांचे आंदोलन अधिक तीव्रपणे होईल, ही बाब केंद्र शासनाने लक्षात घ्यावी, असेही गोरंट्याल यांनी सांगितले.प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि संयोजक महेमूद शेख यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बहुजन आघाडीचे दीपक डोके, जमाते इस्लामी हिंदचे अब्दुल मुजीब, अ. भा. कॉ. सदस्य भीमराव डोंगरे, विजय कामड, प्रभाकर पवार, ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, अहेले सुन्नतूल जमातचे सय्यद जमील अहमद रजवी, समस्त ओबीसी समाजाचे राजेंद्र राख, राजेश काळे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. विनायक चिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे, शेख शमशुद्दीन, मिल्लत बचाव तहरीकचे अफसर चौधरी, ख्रिश्चन डेमोक्रेटिक फ्रंटचे वैभव उगले, कैलास रत्नपारखे, अकबर इनामदार, दिनकर घेवंते, बदर चाऊस, मिर्झा अफसर बेग आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.यावेळी लक्ष्मण म्हसलेकर, विठ्ठलसिंग राजपूत, विष्णू कंटुले, गनी पटेल, राम सावंत, विनोद यादव, अफसर चौधरी, अशोक नावकर, शिवराज जाधव, मुस्तकीम हमदुले, शाकेर खान, तय्यब देशमुख, सय्यद मुस्ताक, शेख अन्वर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.
सामाजिक समतोलासाठी ‘सीएए’ कायदा मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:18 AM