लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तरूणीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले होते. सात दिवसत मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरूणीचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय सेनेच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून कॅन्डलमार्च काढण्यात आला. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शहराध्यक्ष नंदा पवार यांनी केली.गांधी चमन येथे आयोजित कार्यक्रमात नंदा पवार, दीपमाला सोनवणे यांनी या घटनेचा निषेध नोंदवित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच अशा घटना रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश चांदोडे, अमोल रत्नपारखे, अजय चांदोडे, सतीश कसबे, अमोल चांदोडे, गजानन लासुरे, तेजस वाहुळे, दीपमाला सोनवणे, कमल रत्नपारखे, कलावती सोनवणे, शीला बनसोडे, सरोज गायकवाड, अक्षय रत्नपारखे, बाळू शिंगाडे आदींची उपस्थिती होती.
अखिल भारतीय सेनेकडून कॅन्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:49 AM