मागील वर्षभरात कर्णकर्कश हॉर्न असलेल्या ६६० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, १ लाख ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केलेल्या ३३०६ जणांवर कारवाई केली आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
फॅन्सी हॉर्नची फॅशन
nसमोरच्या व्यक्तीला सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर केला जातो. मात्र, वाहनांच्या प्रकारानुसार हॉर्नचा आवाज किती असावा, तो कसा असावा, याबाबत नियम ठरवले आहेत. या नियमांचे बहुतांश वाहनधारक पालन करतात. मात्र, काहीजण आपल्या वाहनाला विचित्र आवाज येईल, अशा प्रकारचे हॉर्न सायलेन्सर लावतात.
कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर...
n कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या व्यक्तीवर कलम १७७ व कलम ११९ नुसार कारवाई केली जाते.
n त्या व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.
n सध्या शहरात रात्रीच्या वेळी काही तरुण भरधाव वेगाने वाहने चालवून कर्णकर्कश हॉर्न वाजवीत आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कारवाया सुरूच
जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत, त्यांच्यावर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल ६६० जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
- कैलास नाडे, स.पो.नि. शहर वाहतूक शाखा,
कानाचेही आजार वाढू शकतात
n जालना शहरात मोठ्या प्रमाणात काही वाहनधारक रात्रीच्या वेळी कर्णकर्कश हॉर्न वाजवितात. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
n कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना कानाचे आजार जडू शकतात. १८ वर्षांच्या आतील व ५५ वर्षांपुढील व्यक्तींना याचा सर्वांत जास्त धोका असतो. कानाचे पडदे हे लवचिक असतात. त्यामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, असे डॉ. परमानंद भक्त यांनी सांगितले.