लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीळ घ्या, गूळ घ्या, गोड बोला, माझ्याशी भांडू नका असे म्हणत बुधवारी जिल्हा व शहरात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. एकमेकींना वाण देण्यासाठी विविध मंदिरांमध्येमहिलांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.बहुतांश वेळा संक्रांत ही नेहमीच १४ जानेवारीला येते. परंतु यंदा तिथीचा क्षय झाल्याने ती १५ जानेवारीला आली आहे. बुधवारी सुगड्याचे वाण देण्यासाठी देखील असा कुठलाच ठराविक वेळेचा मुहूर्त नसल्याने दिवसभर महिलांनी त्यांच्या वेळेनुसार मंदिरात जाऊन पूजा केली.यावेळी नवीन जालना भागातील राम मंदिर, विठ्ठल मंदिर तसेच कसबा परिसरातील विठ्ठल मंदिर, काळुंका माता मंदिर, आनंदी स्वामी मंदिर, अमृतेश्वर मंदिरासह विविध ठिकाणच्या मंदिरामध्ये सुवासिनींनी गर्दी केली होती.यंदा तीळ आणि गुळाचे दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले असले तरी, या दोन्ही घटकांना महत्त्व असल्याने त्याची खरेदी झाली होती.
मकर संक्रांत उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:08 AM