महाकाळा (अंकुशनगर) : अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे व एच. व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त महानवदृष्टी अभियान अंतर्गत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २७० जणांची तपासणी करण्यात आली.
साष्टपिंपळगाव येथेही शिबिर पार पडले. यावेळी २६३ जणांची तपासणी करण्यात आली. अंकुशनगर येथे ७३ तर साष्टपिंपळगाव येथील ६० जणांचे मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निदान झाले. या सर्व व्यक्तींवर पुणे येथील एच.व्ही. देसाई हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुधाकर चिमणे, समर्थ संचालक विकास कव्हळे, संजय कव्हळे, मुख्याध्यापक पंढरीनाथ अटकळ किशोर डावकर, संजय कव्हळे, शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मुंडे, डॉ. अविनाश देशमुख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अतुल तांदळे, डॉ. राजेंद्र गायके, आरोग्य सहाय्यक विजय कांबळे, मंगला अडागळे, आरोग्य सेविका एच.आर. हारके, आर.व्ही. खैरमोडे, ए.आर. पारखे, आरोग्य सेवक जोशी आदींची उपस्थिती होती.