शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जालना जिल्हा कारागृह सीसीटीव्हीच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:15 AM

जिल्हा कारागृहात दहा लाख रुपये खर्च करुन ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा कारागृहात दहा लाख रुपये खर्च करुन ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे संपूर्ण २० एकराचा कारागृहाचा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार आहे. जिल्हा नियोजन समितीने कॅमेरे बसविण्यासाठी १० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात २०१४ मध्ये सुसज्ज जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे. मात्र सहा वर्ष होऊनही कारागृह प्रशासनाला विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. कारागृहाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पोलिसांचे कुटुंबीय, तसेच कारागृहात कैद्यांना ने-आण करताना पोलिसांची दमछाक होत आहे. रस्त्यासह कारागृहात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी कारागृह अधिक्षक धनसिंग कवाळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तसेच वारंवार पाठपुरावा देखील केला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. जिल्हा कारागृहात एका तरुण कैद्याने शौचालयात गळफास घेतल्याने कारागृहातील सुरक्षतेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. सीसीटीव्ही असते तर कदाचीत संबंधित कैद्याला हे कृत्य करण्यापासून वाचविता आले असते. कारागृह अधीक्षक कवाळे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे कारागृह सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याची जिल्हा नियोजन समितीकडून निधीची मागणी केली होती. याला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच हिरवा कंदिल दिला असून, तब्बल १० लाख निधी मंजूर करुन सा. बां. विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास सुरुवात होणार असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.कैद्यांवर करडी नजर७५ एकरापैकी २० एकरवर जिल्हा कारागृहाचा परिसर आहे. ६०० कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या कारागृहात सध्या २७५ पुरुष तर ७ महिला कैदी बंदिस्त आहेत. कैदी आणि परिसराच्या सुरक्षतेसाठी ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात कैदी बराक, मुख्य गेट, कैद्याचा मुलाखत कक्ष इ. ठिकाणी ३० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.रस्त्याचा मार्ग खडतरचकारागृहाकडे जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिसरात कारागृह पोलीस कर्मचाÓfयाची वसाहत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी रस्त्याअभावी मोठी गैरसोय होत आहे.

टॅग्स :jailतुरुंगcctvसीसीटीव्ही