एपीआय पायघन : टेंभुर्णी शांतता समितीची बैठक
टेंभुर्णी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस गंभीर रुप घेत आहे. त्यासाठी आपल्यासह आपल्या परिवाराची काळजी घ्या. तसेच येणारे सण, उत्सव कुठेही गर्दी न करता घरीच साजरे करा, असे आवाहन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी केले आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजानच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना पायघन म्हणाले की, टेंभुर्णीसह परिसरातील अनेक गावात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. सण, उत्सव दरवर्षी येतील मात्र त्यासाठी आपले व आपल्या कुटुंबाचे जगणे महत्त्वाचे आहे, अशी भावनिक साद घालत त्यांनी आंबेडकर जयंती व रमजाननिमित्त कुठेही गर्दी न करता, साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आपापल्या घरातील पात्र सर्व सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही केले.
या बैठकीला माजी उपसरपंच फैसल चाऊस, गौतम म्हस्के, माजी सुभेदार प्रभू वाघमारे, ग्रामविकास अधिकारी सुखदेव शेळके, तलाठी राम धनेश, मौलाना सलीम शेख, हाफिज नासेर, हाफिज माजीद, हाफिज त्यागी, हाजी नसीमोद्दीन सिद्दीकी, प्रदीप मघाडे, भिकनखा पठाण, संतोष पाचे, फकरू कुरेशी, नसीम शेख, उत्सव समितीचे राहुल कांबळे, कपिल जाधव, विजय म्हस्के, डिगांबर भिसे, अनिल गायकवाड, सूर्यप्रकाश मघाडे, प्रेम म्हस्के, गणेश म्हस्के, पोलीस कर्मचारी महेश वैद्य, गजेंद्र भुतेकर, किरण निर्मळ आदींची उपस्थिती होती.
फोटो
टेंभुर्णी येथे सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी मार्गदर्शन केले.