हसनाबाद : सध्या कोरोनाची रूग्ण संख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि. संतोष घोडके यांनी केले आहे. हसनाबाद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. पुुढे बोलताना घोडके म्हणाले की, मागील काही दिवसांपासून कोरोनाची रूग्ण संख्या घडली आहे. असे असली तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. शिवाय, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कोणीही नियमांचे उल्लंघन करू नका, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. पीएसआय अंकुश पाटोळे यांनी मार्गदर्शक केले. याप्रसंगी सरपंच सुरेश लाठी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी गफ्फार, देवलाल आकोदे, कलीम काझी, आनंद पवार, पप्पू जैस्वाल, ॲड. रामफळे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा - घोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:34 AM