लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत लेझीम, गोंधळी, मावळे युवक, युवतींनी बांधलेले भगवे फेटे आणि ढोल ताशांच्या गजरा बरोबरच शांततेचे प्रदर्शन घडले. यामुळे ही शिव जयंती एक आगळी वेगळी ठरली.रेल्वे गेट पासून सकाळी ११ वाजता या शिव जयंतीच्या मिरवणुकीस सुरूवात करण्यात आली. भव्य सजवलेल्या रथावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुढे शाळकरी मुला-मुलींचे लेझीम पथक, गोंधळी, मावळे , युवक व युवतींनी बांधलेले भगवे फेटे या मिरवणूकीचे आकर्षण ठरले. शिस्तीचे प्रदर्शन करत ही मिरवणूक पार पडली. नामदेव वायाळ, शंकर थोटे, प्रकाश चव्हाण यांनी पाणी, लिंबू सरबत, फराळाची व्यवस्था मिरवणुकीत सहभागी शिव प्रेमींसाठी केली होेती. शेवटी गाव भागात उत्साहात या शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, सभापती कपिल आकात, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, नितीन जेथलिया, संदीप बाहेकर, अॅड. जगन बागल, प्रकाश चव्हाण, दीपक कदम, कृष्णा आरगडे, राजेश भुजबळ, बाबा गाडगे, श्रीकांत उन्मुखे, डॉ. संजय पुरी, डी. वाय. काटे सहभागी झाले होते. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल कदम, पांडुरंग नवल, सभाजी तिडके, अशोक तनपुरे, प्रा. भागवत नाईकनवरे, अभय काळुंके, सुनील मगर, सचिन बाहेकर, रमेश सोळंके, संतोष हिवाळे, प्रभाकर दिलीप मगर, विनायक भिसे सहभागी होते.या मिरवणुकीत मुला - मुलींचे लेझीम पथक व युवतींनी भगवा फेटा व वस्त्र परिधान करून सहभाग घेतला. यामध्ये रसिका दिरंगे, विशाखा वायाळ, तेजस्विनी तनपुरे, रोहिणी सुरूंग, जयश्री मगर, स्रेहल बोराडे, शिवानी धुमाळसह अन्य महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
परतूर शहरात शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:21 AM