लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंदीतही ठेवींमध्ये झालेली वाढ लक्षणीय ठरली आहे. नुकतीच मध्यवर्ती बँकेची सर्व साधारणसभा पार पडली. यावेळी गेल्या तीन महिन्यात बँकेच्या ठेवी २८२ कोटी रूपयांवरून ४५२ कोटीवर पोचल्या आहे. बँकेच्या स्वत:च्या गुंतवणूकीतही वाढ झाली असून, कर्ज वसूलीचा टक्का घसरल्याने चिंता कायम आहे. या बँकेने २९० कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले होते. पैकी केवळ ५० कोटी रूपयेच वसूल झाले आहेत.बँकेची सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन मनोज मरकड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संचालक माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, पांडुरंग जन्हाड, चंद्रमणी खरात. यांच्यासह अन्य संचालक तसेच अधिकारी पी.बी. कवठे, विशेष कार्य संचालन अधिकारी डी.एम. पालोदकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी केले. त्यांनी बँकेने गेल्या काही वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. दुष्काळ असतांनाही या बँकेच्या ठेवींमध्ये यंदा १७० कोटी रूपयांची वाढ झाल्याचे सांगितल्यावर त्याचे सर्वांनी स्वागत केले. बँंकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांच्यासह अन्य संचालक मंडळाच्या सहकार्यानेच हे शक्य झाल्याचे देशमुख म्हणाले.यावेळी मरकड म्हणाले की, आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. शेतकºयांना पीकविमा, पीककर्ज देण्यासाठी बँकेने राष्ट्रीकृत बँकापेक्षाही चांगले काम केल्याचे सांगितले. भविष्यातही बँक आणखी नवनवीन योजना राबवून शेतकºयांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी अपुरी संख्या असतांनाही जे काम केले. त्यामुळे बँकेला तीन महत्वाचे पुरस्कार मिळाल्याचेही मरकड यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. या बँकेस बँकींग फ्रंटीयर संस्थेतर्फे उत्कृष्ट चेअरमन, उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच उत्कृष्ट उलाढाल यांचा त्यात समावेश असल्याचे मरकड म्हणाले. संचालन पाडुरंग ज-हाड यांनी केले.
मंदीतही मध्यवर्ती बँकेची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 9:20 PM