लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्या विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची ख-याअथाने फसवणूक केली आहे. कर्जमाफी दिल्याचे सांगून कोणत्याही शेतक-याला या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी झाली असती, तर आत्महत्या थांबल्या नसत्या का, असा सवाल करुन या सरकारने पिकविम्यातही कंपन्यांचा करोडो रुपयांचा फायदा करुन शेतकºयांना उघडे केले आहे, हेच अच्छे दिन आहेत का, असा संतप्त सवाल माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला.जालना विधानसभा मतदार संघातील सारवाडी, रोहणवाडी आणि लोंढेवाडी या गावांना त्यांनी बुधवारी भेटी दिल्या या भेटी दरम्यान गोरंट्याल बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राम सावंत, बाळासाहेब तनपूरे, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, समाधान शेजूळ, अब्दुल राऊफ परसुवाले, अरुण घडलिंग, बबन वाघ, गणेश चौधरी, नामदेव महाराज उगले, तुकाराम चावरे, गणेश कापसे, दिपक उजेड, अंकुश बाळराज, एकनाथ कुटे, सचिन चाळसे, विष्णू काजळे, गणेश मैंद, तर सारवाडीचे पोलीस पाटील पंडित काळे, आसाराम काळे, दामू काळे, भाऊसाहेब काळे, नारायण काळे, उपसरपंच विलास काळे, उध्दव महाराज काळे आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना गोरंट्याल म्हणाले की, केंद्रात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार सत्तेत असताना शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन संकटात असलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला. राज्यातील भाजपा- शिवसेना सरकारने शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या गोंडस नावाखाली कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, पाच वर्षात हे सरकार कर्जमाफी करु शकलेले नाही.त्यामुळे शेतक-यांच्या संकटात अधिकच भर पडली असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी अधिक मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकºयांच्या आत्महत्येला हे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला खाली खेचण्यासाठी येत्या निवडणूकीत शेतक-यांसह सर्व घटकांनी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली सारवाडी येथील रमेश काळे, विठ्ठल काळे, रवि काळे, विठ्ठल नारायण काळे, जीवन काळे, योगेश काळे, लक्ष्मण काळे, शरद कुटे, गणपत काळे, भीमराव काळे, विज्ञान नरवडे, सुदर्शन कमाने, विक्रम नरवडे, गंगाधर काळे, संतोष नाचणे, सुखदेव काळे, मच्छिंद्र पवार, भाऊराव खरात, कैलास काळे, बळीराम काळे, राजाराम काळे, रामकिसन काळे, श्रीधर काळे, परबराव काळे, बाबूराव काळे आदींनी गोरंट्याल यांच्या उपस्थिती काँग्रेस प्रवेश केला.
केंद्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल- कैलास गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:07 AM