लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : सकल मराठा समाजाच्या वतीने भोकरदन येथे गुरूवारी शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर टायर जाळले. भोकरदन येथे मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावर एकही बस मागील तीन दिवसांत धावली नाही. तसेच शाळांना ही अघोषित सुटी होती. भोकरदन येथे मंगळवारी बंद तर बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन बुधवारी मुंडण करण्यात आले. गुरूवारी सकाळी चक्का जाम आंदोलन केले. त्याला मोठा प्रतिसाद म्ळिाला. चक्का जाम आंदोलनादरम्यान शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. सकाळी साडेदहा वाजता चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले होते. दुपारी उशिरा पर्यंत आंदोलन सुरूच होते . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.मलकापूर -पुणे याबसवर दगडफेकगुरूवारी चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडल्यावर गावातून जाणाºया मलकापूर - पुणे बसवर आंदोलनातील काहींनी अचानक दगडफेक केली. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले.
भोकरदन येथे चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:57 AM