लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकावेळी मराठवाड्यातील सर्वात खराब समाजल्या जाणाऱ्या जालनाबसस्थानकाचे रुप सध्या बदलतांना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत असून प्रवाशांना विविध सुविधाही दिल्या जात आहे. त्यामुळे बसस्थाकाचे रुप पलटतांना दिसत आहे.जालना शहर हे राज्याच्या मध्यभागी वसलेले शहर आहे. विदर्भाच्या सीमेवर असल्याने शहरातूनच विदर्भात जावे लागते. त्यामुळे येथून नागपुर, अमरावती, अकोला, वाशिमसह नांदेड, परभणी, हिंगोली यासह आदी बसेस जातात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकही बसनेच प्रवास करतात. त्यामुळे दररोज हजारो नागरिक शहरात येतात. परंतु, शहरातील बसस्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. बसस्थानकात आसन व्यवस्था, पाण्याची सुविधा नसणे, खराब रस्ते, घाणीचे साम्राज्य, शौचालयाची दुरवस्था या असुविधांमुळे प्रवासी बस मधून उतरतही नव्हते.जालना बसस्थानकाचे रुप बदलण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता जालना बसस्थानक हायटेक होण्याच्या मार्गावर आहे.सध्या बसस्थानकातील आसन व्यवस्था, परिसर, बसस्थानकाला रंगरंगोटी आदी करण्यात येत आहे. त्यामुळे बसस्थानकाचे रुप पलडतांना दिसत आहे. सध्या बसस्थानकाचे वेगळे रुप पाहून प्रवाशी समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान, बसस्थानकाचे काम सुरु असून, लवकरच जालना बसस्थानक हायटेक होणार आहे.
बसस्थानकाचे रुप बदलतंय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:10 AM