लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांची सोमवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी पाहणी केली.शहागडसह परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया काही वाहनांवर महसूलच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र यामध्ये काही टॅक्टर, टिप्पर विना नंबरचे आढळून आले. याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना पत्र पाठवले होते. सोमवारी सायंकाळी मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब शेटे यांनी शहागड पोलीस चौकीत असलेल्या अवैध वाळूची टॅक्टर, टेम्पो, टिप्पर, तसेच गोंदी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या वाहनांची तपासणी केली.ही वाहने उपप्रादेशिक कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. आम्ही जप्त केलेल्या वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करून संबंधितांवर दंड आकारणार असल्याचे मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब शेटे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
जप्त वाहनांची आरटीओकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:00 AM
अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांची सोमवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी पाहणी केली.
ठळक मुद्देवाळू तस्करी : चौकशीनंतर आकारणार दंड