शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमली जालनानगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:36 AM

जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका, शोभायात्रा जयंतीचे विशेष आकर्षण ठरल्या.

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका, शोभायात्रा जयंतीचे विशेष आकर्षण ठरल्या. सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने गांधी चमन चौकापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात निघालेल्या मिरवणुका, शोभा यात्रा, दुचाकी रॅली यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघी जालनानगरी दुमदुमली.सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या मिरवुणकीला गांधी चमन चौकातून सायंकाळी पाच वाजता सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, आ. नारायण कुचे, सेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार विपिन पाटील, अंकुशराव राऊत, ब्रह्मानंद चव्हाण, एकबाल पाशा, संजय देठे, संतोष गाजरे, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, विष्णू पाचफुले, रवींद्र राऊत, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, संतोष पाटील, शैलेश देशमुख यांच्यासह उत्सव समितीच्या पदाधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती.मिरवणुकीत सर्वात पुढे बैलगाडीतून वाजणा-या सनई-चौघड्यामुळे वातवारण मंगलमय झाले होते. पारंपरिक मंगल वाद्य, ढोल पथक, लेझीम पथक, घोडे व उंटावर ऐतिहासिक वेशभूषेत स्वार झालेले मावळे, डोक्यावर भगवा फेटा बांधून मिरवणुकीत सहभागी झालेले विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती यामुळे संपूर्ण वातावरण शिवछत्रपतीमय झाल्याचे दिसून आले. हत्ती रिसाला समितीच्या बैलगाडीतील हत्तीवर विराजमान छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील सजीव देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले.मिरवणुकीच्या प्रारंभी मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन व आजची स्थिती या विषयावर पथनाट्य सादर केले. मिरवणूक मस्तगड, मुथा बिल्डिंग, मामा चौकमार्गे सायंकाळी आठ वाजता सावरकर चौकात पोहोचली. पारंपरिक वाद्यांबरोबरच डीजेवरील शिवरायांच्या शौर्य गाथा आणि गर्दीत उंच फडकणारा भगवा झेंडा यामुळे मिरवणुकीत सहभागी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शहरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या मिरवणुका सायंकाळी मामा चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी झाल्या. यावर्षी रथातून निघालेल्या मिरवणुकांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून आले. सावरकर चौक, फूलबाजारमार्गे रात्री नऊच्या सुमारास मुख्य मिरवणूक उडपी कॉर्नरजवळ पोहोचली. त्यानंतर बडी सडकमार्गे रात्री उशिरा शिवाजी महाराज पुतळा चौकात समारोप करण्यात आला. यात राजकीय पदाधिका-यांसह, शासकीय अधिकारी, पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.--------------छत्रपती संभाजी उद्यानासमोर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवरायांची पालखी मिरवणूक व शिवभक्तांच्या दुचाकी रॅलीचा लोणीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसंस्कृती प्रतिष्ठान व राहुल लोणीकर मित्रमंडळ, शिवतेज प्रतिष्ठान, सिंहगर्जना ढोलताशे मंडळ, सिद्धी विनायकनगर वारकरी प्रबोधन मंडळ, बाजी उम्रद गावकरी मंडळ, एम. राज मित्र मंडळ, शंकर मोहिते मित्रमंडळ यांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सिद्धीविनायकनगर वारकरी प्रबोधन मंडळाने ट्रॅक्टरमध्ये ठेवलेली शिवरायांची सिंहासनारुढ प्रतिमा, बैलगाडी समोर टाळ-मृदंगाच्या गजरात पावले खेळणारे बाल वारकरी सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. इंदेवाडी व लक्ष्मीकांतनगरमधील मिरवणुका दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाल्या.-------------घराघरात शिवजयंतीचा उत्साहयावर्षी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घरा-घरात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. गृहिणींनी सकाळीच सडा-रांगोळी काढली. बहुतांश घरांमध्ये पाटावर शिवरायांची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सोशल मीडिया शिवमयव्हॉटस्अप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावर आठवडाभरापासून शिवजयंतीचे संदेश झळकत होते. सोमवारी तर सोशल मीडिया शिवमय झाला होता.