अंनिसकडून सत्यकुमार उपाध्याय यांचा सत्कार
जालना : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयएएस परीक्षेत यश संपादीत केल्याबद्दल सत्यकुमार उपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर गिराम, मधुकर गायकवाड, संजय हेरकर, नारायण माहोरे, प्रशांत वाघ, मनोहर सरोदे, माया गायकवाड, सुभाष कांबळे, गणेश गव्हाणे, राम उपाध्याय, अजित उपाध्याय आदींची उपस्थिती होती.
समर्थनगर भागात स्वच्छता मोहीम
जालना : शहरातील समर्थनगर भागात नगर पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना सांगण्यात आले. या मोहिमेत निरीक्षक अरूण वानखेडे, दफेदार, श्रत्तवण सराटे, मोहन कांबळे, दीपक कारके, शशिबाई मिसाळ यांच्यासह गौतम मोरे, दीपक बुक्तरे, प्रताप राठोड, एन. डी. गायकवाड, प्रेमदास घागरे, सोळंके, रवी हनवते, मोतीलाल लोखंडे यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला.
अवैध गुटखा विक्री; कारवाईची मागणी
जालना : शहरासह परिसरात अवैध गुटख्याची विक्री जोमात सुरू आहे. शासनाने बंदी घातलेला गुटखा शहरातील विविध पानटपऱ्यांसह दुकानांमध्येही सहज उपलब्ध होत आहे. असे असताना कारवाईची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई मोहीम राबविली जात नसल्याचे चित्र शहर व परिसरामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अवैध गुटखाविक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.