लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पप्पा मला वाचवा, मी डुबतोय एवढे दोन शब्द कानावर पडल्यावर मी मूर्ती जवळून मुलाच्या आवाजाकडे पाहिले. तो पर्यंत त्याने एक डुबकी खालली होती, दुसऱ्या डुबकीला तो वर येईल आणि आपण त्याला पकडू या विचारात असतानाच मुलगा पाण्याच्या लाटेने माझ्यापासून पंधरा फूट दूर गेला तो कायमचाच असा मन हेलावून टाकणारा प्रसंग निहाल खुशाल चौधरीचे वडील खुशाल चौधरी हे त्यांच्या नातेवाइकांना सांगत होते. तर लक्ष्मीनारायणपुरा भागातील अमोल रणमुळे यांची आई तर चक्क रूग्ण वाहिकेच्या पुढे पळत होती. एवढे करूनही मुल हाती न लागल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळा होता. तशीच परिस्थिती शेखर भदनेकर या मृत मुलाच्या घरी होती.सर्वत्र ढोल ताशे, गुलालाची उधळण होती. प्रत्येकाच्या चेहºयावर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठीचा आनंद ओसंडून वाहत होता. हे सर्व उत्साही आणि आनंदी वातावरण असतानाच मोती तलावाजवळ वाचवा..वाचवा..अशी किंकाळी ऐकू आली. त्यात उपस्थित अग्निशमन यंत्रणा, जीव रक्षक बोटी त्या आवाजाकडे सरसावल्या परंतु तो पर्यंत अमोल रणमुळेवर काळाने झडप घातली. आणि त्यातच त्याचा करूण अंत झाला.या घटनेला दोन तास होत नाहीत, तोच पुन्हा मोती तलावातील भोवºयाने आणखी दोन युवकांना आपल्या चक्रव्यूहात ओढले. त्यात नेहाल खुशाल चौधरी आणि शेखर भदनेकर या दोन मुलांना मोती तवालाने गिळंकृत केले. त्यातील नेहालला आपण डुबत असल्याची कल्पना आल्याने त्याने सोबच असलेल्या वडिलांना ‘पप्पा मी डुबतोय मला वाचवा’ अशी हाक दिली. ही हाक ऐकताच मी तातडीने निहालकडे वळलो. तो पर्यंत त्याने एक डुबकी खाल्याने त्याचा केवळ आवाजच आला आणि नंतर ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने मी शोधण्याचा प्रयत्न केला असता मुलगा हाती लागला नाही, केवळ त्याचा मृतदेह दिसून आल्याने मोठा धक्का बसला. मुलाला वाचवू न शकल्याची मोठी खंत ही आता मला आता आयुष्यभर एखाद्या भळभळत्या जखमेप्रमाणे ती सलत राहणार, असे खुशाल चौधरी हे भेटतील त्याला सांगत होते.
मुलाला वाचवता न आल्याची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:07 AM