लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : शिक्षणाची गोडी लागावी, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी या उद्देशाने शाळांमध्ये पोषण आहार दिला जात आहे. तांदळाची खिचडी, वरण भात, मटकी, वाटाणा, हरभरा तसेच एक दिवस पूरक आहार देण्याचे आदेश असतानाही कित्येक शाळेत केवळ खिचडीवर विद्यार्थ्यांची बोळवण केली जाते. या सर्व शाळांची गोपनीय चौकशी करून कारवाईची मागणी पालक वगार्तून होत आहे.शाळेतील मुलांना पोषण आहार शाळेतच मिळावा यासाठी मूंगदाळ खिचडी, मटकी भाजी, भात, वरण भात, चणा हरभरा, खिचडी, तसेच एक दिवस पूरक आहारात यात केळी, बिस्किटे, राजगिरा लाडू देणे बंधनकारक असताना देखील ग्रामीण भागातील कित्येक शाळेत, तर शहरातील काही जि.प.च्या दुर्लक्षित शाळेत फक्त खिचडी व वरण भातावर विद्यार्थ्यांची बोळवण करून शासनाच्या विद्यार्थी संख्या वाढविणे व शिक्षणाची गोडी निर्माण करणे या मुळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. तर यातून मूगदाळ, हरभरा, व पूरक आहार एक एक करून गायब होत असल्याचे दिसत आहे.शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर ग्रम खिचडी, तर सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दीडशे ग्रॅम खिचडी शिजवण्याचे आदेश असताना सर्वच शाळेत शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षांना हाताशी धरून वेगळीच खिचडी ‘शिजत’ आहे.शासनाने ठरवून दिलेला आहार देण्यात यावा, न देणाºया शाळांची गोपनीय माहिती घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खिचडी खाऊन कंटाळली मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:10 AM