लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आई-वडील ऊसतोड कामगार. त्यामुळे हंगाम सुरू होताच शाळा सोडून मुलांना फडात जावे लागते. मात्र, अशीच चार मुले शाळाबाह्य शोधमोहिमेमुळे पुन्हा शाळेत पोहोचली आहे. तालुक्यातील शिंगोना शिवारातील उसाच्या फडात राहणाºया चार शाळकरी मुलांना बुधवारी शिंगोना येथील शाळेत प्रवेश देण्यात आला.शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुलांचा घेत असताना शिंगोना शिवारात उसतोड कामगारांसोबत इयत्ता ३ री, ५वी, ६ वी, ९ आठवीच्या वर्गात शिकणारे चार शाळाबाह्य मुले आढळून आली.हे विद्यार्थी जालना तालुक्यातील शंभू सावरगाव शाळेतील आहेत. या विद्यार्थ्यांना तात्काळ शिंगोना येथील शाळेत तात्पुरता प्रवेश देण्यात आला. मुख्याध्यापिका सखुबाई मुजमुले, विष्णूपंत कदम, संजय जाधव, अश्विनी मोरे, मंगल केंद्रे, गोदवरी अंबूलगे यांनी ही शोधमोहीम राबवली होती. याबद्दल त्यांचे गटविकास अधिकारी अशोकराव पाटील, केंद्रप्रमुख सत्यकुमार सरोदे, गटसमन्वयक कल्याण बागल यांनी कौतुक केले आहे.
ऊसाच्या फडातील मुले पोहोचली शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:04 AM
लोकमत न्यूज नेटवर्क परतूर : आई-वडील ऊसतोड कामगार. त्यामुळे हंगाम सुरू होताच शाळा सोडून मुलांना फडात जावे लागते. मात्र, ...
ठळक मुद्देशाळाबाह्य मुले शोधमोहिमेचे यश : शिंगोना शाळेत मिळाला तात्पुरता प्रवेश