लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात नाताळनिमित्त चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, ख्रिस्त जन्माची तयारी पूर्ण झाली आहे. येथील सहकार बँक कॉलनीत राहुल शिंदे यांनी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर म्युझिक वाजवून मुलांना सांताक्लॉजचा देखावा बच्चे कंपनीचे मोठे आकर्षण ठरत आहे.राहुल शिंदे यांनी नाताळ सणानिमित्त गेल्या पाव वर्षापासून विविध आकर्षक देखावे करण्याची परंपरा याहीवर्षी तेवढ्याच उत्साहाने पार पाडली आहे. नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताची प्रार्थना आणि मनन करण्याचा दिवस आहे.या माध्यमातून अनेकांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना चर्चमध्ये जाऊन केली जाते. संपूर्ण विश्वात शांतता आणि सलोखा राहावा म्हणूनही ख्रिश्चन बांधव प्रार्थना करतात.जुना जालना भागातील शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी नाताळची तयारी पूर्ण केली आहे. या निमित्त त्यांनी जो सांताक्लॉज उभारला आहे, त्याला आकर्षक पध्दतीने सजविले आहे.सोमवारी नाताळच्या पूर्व संध्येला परिसरातील बच्चे कंपनीला बोलावून सांताक्लॉजच्या माध्यमातून चॉकलेटचे वाटप करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले. यामुळे बच्चे कंपनीन्ने एक दिवस आधीच नाताळ सणाचा मनमुराद आनंद लुटला आहे.
सांताक्लॉजकडून चॉकलेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:42 AM