लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात होत असलेल्या सिडको प्रकल्पाची जागा तीन वेळेस बदलण्यात आली. विकास प्रकल्पांसाठी शहरात जागेची अडचण असली तरी जालन्यात सिडको प्रकल्प आणणारच अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली.येथील कलश सीड्सच्या मैदानावर रविवारी रोटरी जालना एक्स्पो २०१७ च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर, सचिव डॉ. दीपक बगडिया, सुनील रायठठ्ठा, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, हेमंत ठक्कर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.दानवे म्हणाले, की प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौºयांमुळे अनेक परदेशी उद्योग समूह भारतात येण्यास उत्सुक असून, सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सरकार मेक इन इंडिया, कौशल्य विकास इ. उपक्रम राबवीत आहे. ड्रायपोर्ट, रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी), सीडपार्क इ. प्रकल्पांमुळे येणाºया काळात जालन्याचे भविष्य उज्ज्वल आहे.डीएमआयसी प्रकल्पातील औद्योगिक प्र्रदर्शन केंद्राच्या कामाला गती देण्याबरोबरच सिडको प्रकल्प शहरात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्त्याची कामे यासाठी सुमारे अडीचशे कोटींचा निधी आणला असून, ही कामे प्रगतिपथावर आहेत. आयसीटी प्रकल्पाचे वर्ग यावर्षी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १४ कोटींचा निधी मंजूर केला असून, यावर्षी हे वर्ग सुरू होतील. त्यामुळे येणाºया काळात जालन्याचा विकास कशा पद्धतीने करावयाचा याचे नियोजन दूरदृष्टी ठेवून स्थानिक उद्योजकांनी करावे.जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
जालन्यात सिडको प्रकल्प लवकरच आणणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:13 AM