शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

मंडळ अधिकारी, तलाठ्यास १४ हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:02 AM

मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना तालुक्यातील विरेगाव येथील मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली यांनी एका शेतकऱ्याच्या सातबारामध्ये त्यांच्या आडनावात दुरूस्ती करण्यासाठी लाच मागितली होती. त्यापैकी लाचेचा पहिला हप्ता म्हणून या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या सातबाराच्या उता-यावर आडनावात चूक झाली होती. ही चूक दुरूस्त करण्यासाठी प्रथम संबंधित शेतक-याने तलाठी गुल्लापेल्ली यांची भेट घेतली. तसेच आडनावात बदल करून देण्यासाठी विनंती केली. परंतु ही दोन प्रकरणे असल्याने गु्ल्लापेल्ली यांनी प्रत्येक सहा हजार रूपये लागतील असे तक्रारदारास सांगितले. तसेच मंडळ अधिकाऱ्यांकडून फेर मंजूर करण्यासाठी स्वतंत्र रक्कम द्यावी लागेल, असेही नमूद केले.त्यानंतर त्या तक्रारदाराने कांचननगर येथे राहत असलेले मंडळ अधिकारी भार्डीकर यांच्या निवासस्थानी जाऊन विनंती केली. परंतु गुल्लापेल्ली यांनी सांगितलेली रक्कम योग्य असल्याचे सांगून २५ हजार रूपये लागतील, असे भार्डीकर यांनी सांगितले. परंतु संबंधित तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी या विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी तलाठी गुल्लापेल्ली याने भार्डीकर यांच्या सांगण्यावरून १४ हजार रूपये घेतले. तसेच ते परस्परांमध्ये वाटूनही घेतले. परंतु पैसे खिशात ठेवून हे दोघे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत बसले असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्या दोघांना बैठकीतून बाहेर बोलावून घेत अटक केली. तेथेच त्यांचा पंचनामा केला. यावेळी दोन्ही कर्मचारी विनंती करताना दिसून आले. अटक करण्यात आल्याचे समजताच दोघांनाही घाम फुटला होता. जिल्हाधिकाºयांच्या दालनाशेजारील एका खोलीत या दोन्ही संशयितांना थांबवून पंचनामा केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक श्रीकांत परदेशी, उपअधीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.भ्रष्टाचार निर्मूलनाची बैठक अन सापळादर महिन्याला होणारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी होती. त्यासाठी देखील पोलीस तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी हे सोामवारी दुपारी बैठकीस आले होते. परंतु तेथेच त्यांनी हा सापळा रचल्याची खबर कोणालाही कळली नाही.अचानक अधिका-यांची लगबग आणि पोलिसांच्या खास शैलीत ए.सरका.. बाजूला असे म्हणत त्या दोन लाचखोरांना एका बंद खोलीत नेऊन नंतर पोलिसांच्या जीपमधून अटक करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेण्यात आले.ही बैठक सुरू असतानाच या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर नेमके काय झाले हे अधिका-यांना कळण्यापूर्वीच त्या दोघांना अटक केली होती. नेमकी किती लाच कोणी घेतली, यावरूनही तर्कवितर्क लावले जात होते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकRevenue Departmentमहसूल विभाग