जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनकडून विविध उपाययोजना केले जात आहे. शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन काळात शासनाने अत्यावश्यक सेवांना मुभा दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा तीव्र कारवाई केली जाईल. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. अत्यावश्यक काम असेल तरच त्यांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी केले आहे.
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी
जालना शहरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ््यांवर कारवाई केली जाणार आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून, तसे आदेश पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. कोणी विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे ही अपर पोलीस अधीक्षक देशमुख म्हणाले.