शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागरिक, पोलिसांचे विघ्न दूर होवो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:49 IST

दोन महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील नागरिक आणि पोलिसांवर चोरी, दरोडे, लुटमार यामुळे एकामागून एक विघ्न कोसळत आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दोन महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील नागरिक आणि पोलिसांवर चोरी, दरोडे, लुटमार यामुळे एकामागून एक विघ्न कोसळत आहेत. सध्या विघ्नहर्त्या गणेशाची धूमधडाक्यात स्थापना झाली आहे. त्यामुळे हा संकटांचा सिलसिला दूर होऊन पुन्हा सुख, समृद्धी आणि शांततेने जीवन जगण्याची कृपा गणेशरूपी विघ्नहर्त्याने केल्यासच या गणेश उत्सवाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.चोºया, दरोड्यांच्या घटनांमुळे ज्या प्रमाणे सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे, त्याच प्रमाणे पोलीसांचीही झोप उडाली आहे. तरूण तेज तर्रार पोलीस अधीक्षक चैतन्य एस. रूजू झाल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने वाळू माफियांच्या बालेकिल्ल्यात जाऊन कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर त्यांची सर्वत्र वाहवा झाली. मात्र, नंतर आता ही वाळू माफियांवरील कारवाई देखील सध्या थंड बस्त्यात पडली आहे. याची अनेक राजकीय कारणे असल्याचे स्पष्टपणे बोलले जात असून, बड्या नेत्यांनी वाळू माफियांवरील कारवाईला लगाम घातल्याची जोरदार चर्चा सध्या गोदावरी पट्टयात सुरू आहे. मात्र, या चर्चेत तथ्य नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. वाळू माफियांचा उच्छाद संपविण्यासाठी सिंघम स्टाईलनेच पोलीसांना काम करावे लागणार आहे. वाळू माफियांचा हैदोस कायम असतानाच चोरट्यांनी त्यांचा मोर्चा आता गाव आणि शहरात वळविला आहे. वडीगोद्री, आष्टी, कुरण तसेच भोकरदन, जालना शहरात दोन महिन्यांमध्ये चोºया, दरोड्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. जालना शहरातील सोनल नगरमध्ये भरदिवसा घरफोडी करून रिव्हॉल्वर लांबविले जाते. तसेच रोख रक्कम आणि दागिन्यांवर हात साफ केला जात आहे. ही चोरी समजू शकतो. मात्र ग्रमीण भागात चोरट्यांकडून थेट महिला, मुले आणि माणसांवर शस्त्राने हल्ला करून चोरी करण्याच्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांच्या या घुसखोरीला पोलीसांकडून तेवढेच जबर उत्तर देण्यासाठी आता पोलीसांनी थेट शहागड, वडीगोद्री तसेच अन्य ग्रामीण भागात मुक्काम वाढवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप पाहिजे त्या प्रमाणात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले नाही. सध्या गौरी-गणपतीचे आगमन झाले असून, अनेकजण आपल्या महालक्ष्मीला दागिन्यांचा साज चढवून पूजा करतात. या संधीचाही चोरटे लाभ उचलू शकतात ही माहिती लक्षात घेता, पोलीसांनी गस्त वाढविली असल्याचे सांगण्यात आले. चोरी आणि दरोडे वाढण्यामागे पावसाने दिलेली हुलकावणी हे देखील एक महत्वाचे असल्याचे बोलले जाते. दुष्काळामुळे काही काम-धंदा नसल्याने देखील चोºया, दरोड्याचे प्रमाण वाढत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. या निसर्गाच्या लहरीपणासह, नागरिकही स्वत:च्या मालमत्तेची पाहिजे तेवढी काळजी घेतना दिसत नाही. गावाला जायचे झाल्यास आता तर शेजा-यालाही सांगणे म्हणजे स्वाभिमान दुखावण्यासारखे मानले जाते. पूर्वी एखादे कुंटुंब गावाला जात असेल तर त्याची पूर्व कल्पनाही शेजाºयांना असायची. आमच्या घरावर लक्ष राहू द्या, असे सांगूनच गावाला जाण्याची प्रथा होती ती आता बंदच झाली आहे. शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये एखाद्या घराचा पत्ता जाणून घ्यायचा झाल्यास आसपास कोणीच नसते. हे जरी सगळे खरे असले तरी, सर्व नशीबावर सोडून चालणार नाही. त्यासाठी पोलीसांना त्यांचा जरब दाखवून त्यांच्यासह नागरिकांवरील चोºयांचे विघ्न कमी करण्याची सुबूध्दी विघ्नहर्त्याने द्यावी हीच अपेक्षा!

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Crime Newsगुन्हेगारी