लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोणत्याही समाज घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार न्याय मिळावा, न्यायालयाच्या नियामानुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, या विषयी जागृती करण्यासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून रविवारी सकाळी शहरात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील अनेक महिला, नागरिकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.जालना शहरातील मंमादेवी चौकात रमेश पटेल, घनश्याम गोयल, नरेश गुप्ता, सत्यनारायण सारडा, मनोज महाराज गौड, कैलास लोया, अॅड. बलवंत नाईक, ओमसेठ मंत्री, सुभाषसेठ देविदान, शिवरतन मुंदडा, सुदेश सकलेचा, डॉ. स्वाती कुलकर्णी, अर्जुन गेही, सुरेश तलरेजा, विनय कोठारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात करण्यात आली. सकाळी ७.३० वाजता श्रीकिशन डागा यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. सदर रॅली मंमादेवी मंदिरपासून लोखंडी पूल, काद्राबाद, पाणीवेसमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला. यावेळी विविध घोष फलक घेऊन विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता तवरावाला यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार सचदेव मार्गदर्शन केले. आभार सचिव सुनील बियाणी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी जितेंद्र गेही, उमेश बजाज, प्रवीण मोहता, डॉ. संजय रूईखेडकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
रन फॉर मेरिट रॅलीस शहरवासीयांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:42 AM