लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दोन महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. पाण्याअभावी फळ खराब होण्याची भीती असते. यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीची आवक वाढली आहे. दररोज चारशे ते पाचशे टन मोसंबी येत आहे. मात्र मोसंबीला योग्य भाव येत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी हैराण आहेत.आंबेबहराच्या मोसंबीची सध्या बाजारात आवक सुरु आहे. जालना, घनसावंगी, अंबड, भोकरदन आदी तालुक्यातून सध्या चारेश ते पाचशे टन मोसंबीची आवक येथील ्रकृषी उत्पन्न बाजार समितीत आवक आहे. जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने फळ झाडावरच खराब होण्याच्या धास्तीने शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबी विक्रीस आणत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी व्यापा-यांना थेट शेतातच भाव करुन बाग विक्री करण्याचा सपाटा सुरु केला आहे. मात्र बाजारात मोसंबीची आवक वाढूनही शेतक-यांना योग्य भाव मिळत नसल्याची खंत मोसंबी उत्पादक शेतकरी मुरलीधर गाढे यांनी व्यक्त केली. चांगल्या मोसंबीला १७ ते १३ हजार रूपये टन मोसंबीला भाव देण्यात येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मोसंबीचे भाव प्रतिटन अवघे नऊ ते दहा हजार एवढाच होता. यात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे शेतकरी समाधान व्यक्त केले. यात वाढ करण्याची गरज शेतक-यांनी व्यक्त केली.
आवक वाढूनही मोेसंबीला भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:30 AM