अंबड : शहरातील नागरिकांनी अकृषी कराचा भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केले आहे. महसूल विभागाच्या वतीने अकृषी कराच्या वसुलीसाठी पाच मंडळ अधिकाऱ्यांसह ३३ तलाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकामार्फत करवसुली सुरू आहे.
पीर पिंपळगावात आशा स्वयंसेविकांचा सत्कार
जालना : पीर पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ.मिर्झा बेग, राणी पोतराजे, दीपा रगडे, शारदा कांबळे, भारती जोगदंड, मिरा शेळके, राणी गव्हाड, लता गुंडलकर, शोभा सोनवणे, वर्षा ढगे, संध्या दाभाडे, सविता इर्शिद, तुळसा गायके, सत्यभामा गोरे, संगीता पगडे, रेणुका गिराम यांच्यासह आशा स्वयंसेविकांची उपस्थिती होती.
पिंपळगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद
बदनापूर : तालुक्यातील देव पिंपळगाव येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व भैरवनाथ अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त छत्रपती राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. यावेळी बाळकृष्ण महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज ठुबे, बबनराव नन्नवरे, सोनाजी नन्नवरे, गणेश जाधव, पांडुरंग नन्नवरे, कैलास शहागडकर आदींची उपस्थिती होती.