रात्रीच्या वेळी चोऱ्या, घरफोड्या, खून आदी गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असते. हे गुन्हे घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग केली जाते. गस्तीसाठी १६ वाहने देण्यात आली आहेत. रात्रीच्या गस्तीसाठी चार्ली पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. या चार्ली पथकांना दुचाकी देण्यात आल्या आहेत, तर प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन चारचाकी वाहने देण्यात आली आहे. यात सदर बाजार, तालुका पोलीस ठाण्याला दोन वाहने देण्यात आली आहे, तर कदीम जालना व चंदनझिरा पोलीस ठाण्याला प्रत्येकी एक वाहन देण्यात आले आहे. या वाहनांद्वारे शहरात गस्त घातली जाते.
शहरात वर्षभरात २५० चोऱ्या, घरफोड्या
जालना शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या व घरफोडण्याचे प्रमाण वाढले आहेत. वर्षभरात तब्बल २०० चोऱ्या आणि घरफोड्या झाल्या आहेत. यात १५१ चोऱ्या तर ४९ घरफोड्या झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगसाठी अधिकारी व कर्मचारी असतानाही चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.