लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील वीज वितरण कंपनीतील धनादेश बाऊन्स प्रकरणात लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच, त्याची दखल मुख्य अभियंत्यांनी घेतली असून, या प्रकरणात प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत उच्चस्तर लिपिकाला निलंबित करण्यात आले असून, सहायक लेखापालाची चौकशी प्रस्तावित केली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांनी बुधवारी दिली.जालना येथील मस्तगड येथील वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयात शेकडो ग्राहकांचे धनादेश न वटल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यात वीज वितरण कंपनीतील अधिकारी तसेच बँकातील काही कर्मचाऱ्यांचे रॅकेट सहभागी आहे काय, या अंगाने चौकशी करण्यात येणार आहे. बुधवारी या संदर्भात लोकमतने धनादेश बाऊंन्स प्रकरणी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते.त्याची दखल घेत बुधवारी जालना दौ-यावर असलेल्या समन्वय वीज वितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह मुख्य अभियंता सुरेश गणेशकर आणि अधीक्षक अभियंता हुमणे यांनी घेतली. त्यानुसार या बाबतमची माहिती त्यांना पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही माहिती मिळताच या प्रकरणाची तीन अधिका-यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, त्यात लेखापाल हे प्रथमदर्शनी दोषी आढळून आले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे वीज ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पोलीस कारवाईच्या धमकीमुळे नाराजी व्यक्त होत आहे.नेमका घोटाळ्याचा पत्ता लागेना...या संदर्भात हा नेमका प्रकार कसा घडला या बद्दल वीज वितरण कंपनीतील अधिकारी देखील आवाक् आहेत, हा धनादेश संबंधित वीज ग्राहकाने वीज वितरण कंपनीच्या नावाने दिल्यावर तो संबंधितांच्या बँक खात्यातून क्लीअर होऊन ती रक्कम वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा होते. मात्र येथे जुलै महिन्यातील एका ग्राहकाला दहा हजार रूपयांचे बिजबिल आले होते,त्यांनी हे बिल भरण्यासाठी धनादेश दिला होता. मात्र त्यांचा धनादेश न वटल्याचे कारण हे त्यांचा धनादेश नवीन स्कॅनिंग प्रणालीनुसार स्कॅन न झाल्याने रद्द झाल्याचा मॅसेज त्यांना आला आहे. मात्र दुसºया प्रकरणांमध्ये संबंधित घोटाळा करणा-यांमधिल व्यक्तीने लोकांकडून विजबिलाची रक्कम घेऊन स्वत:चा धनादेश दिल्याचे उघड झाले आहे.अनेक वीज बिलांमध्ये एकाच बँकेचे धनादेश प्राप्त झाल्याने एक बँक अधिकारी देखील अवाक् झाले आहेत. एकूणच हा घोटाळा नेमका कसा झाला याचा खुलासा करतानाही वीज वितरण कंपनीतील अधिकारी चक्रावले आहेत.
लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:37 AM