लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी दहा वर्षापूर्वी शहरातील प्रमुख दहा चौकांमध्ये जालना पािलकेने स्वयंचलित सिग्नल बसविले होते. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी हे सिग्नल बंद पडले आहेत. हे सिग्नल दुरूस्त करण्यासाठी जालन्यातील उद्योजकांनी पुढकार घेत हे सिग्नल सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.जालन्यातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी विशेष महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी पंधरा दिवसांपूर्वी जालन्यात भेट दिली होती. त्यावेळी वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावर विशेष लक्ष देण्यासाठी या शाखेला ५० कर्मचारी देण्यात आल्याचे मुत्याल यांनी सांगितले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी देखील शहर वातूक सुरळीत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यानुसार एस. चैतन्य यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी येथील उद्योजकांकडे जाऊन शहरातील सिग्न व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथील उद्योजकांनी त्यांना सकात्मक प्रतिसाद दिला आहे. हे सिग्न सुरू करण्यासाठी अंदाजे ३० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळी ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी गाड्यांची पार्किंग केली जात नसल्याचे चित्र दिसून येते. त्याममुळे यापुढे चुकीच्या पध्दतीने उभ्या केलेल्या गाड्यांना औरंगाबादप्रमाणे टो-व्हेईकल भाडे तत्वावर घेण्यात येणार असल्याचेही नियोजन करण्यात आल्याचे काकडे म्हणाले.
बंद सिग्नल पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:59 AM