जालना : माझे वडील स्व. अंकुशराव टोपे तसेच आमच्या परिवारातील अन्य ज्येष्ठांनी अंबड, घनसावंगी तसेच जालना जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. भविष्यातही आपण त्यांचा हा वारसा पुढे चालवू, असे आश्वासन आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदार संघातील प्रचार सभा तसेच वैयक्तीक संपर्क दौऱ्यादरम्यान केले.घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यभरापासून तळ ठोकला आहे. या दरम्यान त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा अधिक गावांना भेटी देऊन शेतकरी, बेरोजगार नागरिकांशी संपर्क साधला. यावेळी राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी कशी फसवी आहे. याच्या अनेक तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. पिकविमा कंपन्यांनी नुकसान भरपाई न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे.गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही वेळी जनता आपल्या पाठीशी राहिल. अशा विश्वास असून, वडीलांनी उभारलेल्या वटवृक्षाचा सांभाल आपण करत आहोत. एकूणच शिक्षण, सहकार याला आम्ही महत्व दिले. आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असताना अंबड येथे ५ कोटी रुपये खर्च करुन कौशल्य विकास केंद्र उभारले. त्याचाही मोठा लाभ बेरोजगारांना झाला आहे. यावेळी सतीश टोपे यांची उपस्थिती होती.
सहकार, शिक्षणातून साधला विकास- टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:41 AM