यावेळी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, मॉड्युलर आयसीयूचे नोडल अधिकारी डॉ. संजय जगताप, प्र. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन पवार, प्र. प्रशासकीय अधिकारी नोडल अधिकारी ऑक्सिजन डॉ. संतोष जायभाये, नेत्रतज्ञ डॉ. उदयन परितकर, मंगेश देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी १०० खाटांच्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या कामाचा तपशीलवार आढावा घेऊन या कामावर कामगाराची संख्या वाढवत दिवस व रात्रपाळीमध्ये काम करून ते वेगाने पूर्णत्वास नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याची शक्यता पाहता पीएसए व लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे कामही तातडीने पूर्ण करावे, असेही ते म्हणाले. तसेच जंबो-डॅयुरा सिलिंडरची मागणी करून तेही उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या सर्जिकल आयसीयूचीही पाहणी करून हे कामही पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्हा रुग्णालयातील बांधकाम, नेत्र रोग कक्ष, ऑपरेशन थिएटर, पी.एम. रुम अशा सर्व ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाची प्रगती जाणून घेतली.