लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : वाढत्या उन्हामुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांचे हाल होत आहे. तीव्र उन्हात पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाणा-पाणी उपक्रमांतर्गत झाडांवर ठिकठिकाणी प्लास्टिक टोपल्यांमध्ये पाण्याची सुविधा केली केली.गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीसाठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी पशु-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे.पाण्यासाठी कासावीस झालेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली तर त्यांचे हाल थांबतील या हेतूने लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांवर झाडांना प्लास्टिक टोपली व बरण्या अडकवून त्यात पाण्यासह धान्य ठेवले आहे. विद्यार्थ्यांसह उपमुख्याध्यापक एस. के. वायाळ, पर्यवेक्षक सुभाष खुरपे, सचिन खरात, बी. एस. ढोबळे, त्र्यंबक घुगे, संतोष साळवे, एस.डी. पंढरीनाथ देशमुख, अरूण वावरे, प्रमोद कामठे, दिनकर सालगावकर, माणिक काळे, संजय कदम, निवृत्ती कातारे, प्रभाकर मस्के यांनी पुढाकार घेतला आहे.
चिऊ ये, दाणा खा... पाणी पी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:17 AM