शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 3:13 PM

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

ठळक मुद्देदुष्काळावर मात करण्यासाठी साडेपाच हजार विहिरींची कामे

- दीपक ढोले

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आठही जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५५१३ सार्वजनिक विहिरींची कामे केली जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहिरीतून पाणी शेंदतांना अनेकांना जीव गमवावा लागला. तहान भागविण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवरील खर्च टाळण्यासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलावाच्या ठिकाणी किंवा पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सार्वजनिक विहिरींची कामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

मराठवाड्यात तब्बल ५५१३ विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या सार्वजनिक विहिरींद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ५५१३ पैकी ४९७१ विहिरींना तांत्रिक मान्यता देण्यात आली. ४५०५ विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ४२६४ विहिरींची स्थळ पाहणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गतवर्षी ३०७४ विहिरींची कामे पूर्ण सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचे जालना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या मुबलक पाणी असल्याने बहुतांश विहिरींची कामे बंद आहेत.

जालना टॉपवर; अनेकांना मिळाला रोजगारमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जालना जिल्ह्याला ६०७ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६६ विहिरींची कामे सुरू करण्यात आली असून, १८० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींची कामे पूर्ण झाली. ३३८ विहिरींना पाणीदेखील लागल्याचे इंगळे यांनी सांगितले.दुष्काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी या विहिरींची कामे मजुरांमार्फत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार विहिरींची कामेही मजुरांमार्फत केली जात आहेत. या संकल्पनेमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहेत.

जिल्हानिहाय पूर्ण झालेल्या विहिरींची संख्याजिल्हा             सुरू विहिरी             पूर्ण विहिरीऔंरगाबाद            २६२                        २४

जालना                ४६६                       १८०बीड                     ३७८                       १०६

परभणी              ३२७                         ६१हिंगोली              ५२४                         ९१

नांदेड                 २८५                        ३७लातूर                 ३४५                       ४५

उस्मानाबाद       ४८७                       २१ 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ