जालना : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी जालना आणि तालुक्यातील ग्रामीण भागात भेट दिली. यावेळी अनेक सूचनाही त्यांनी केल्या.
प्रारंभी सुनील केंद्रेकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासोबत दालनामध्ये चर्चा केली. त्यानंतर केंद्रेकर यांनी दरेगाव तसेच जालना पालिकेने उभारलेल्या वन उद्यानाची पाहणी केली. दरम्यान, केंद्रेकर यांनी क्रीडा प्रबोधिनीस भेट देऊन तेथे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.
ऐन कोरोना काळातही क्रीडा प्रबोधिनीत राबविलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. जालना तालुक्यातील कचरेवाडी येथे रेशीम शेती प्रकल्पास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. अत्यंत कमी पाण्यात येणारे हे उत्पादन शेतकऱ्यांनी अन्य पिकांच्या तुलनेत अधिकचे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.