जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक अंकुश गोविंद कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, तत्कालीन कार्यकारी अभियंता तसेच औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंत्याचा स्वीय सहायक आणि अन्य एका कंत्राटदाराविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अंकुश कांबळे यांची ओळख कंत्राटदार जयंत याने जालना पालिकेतील कर्मचारी दीपक मांडे यांच्याशी करून दिली. बांधकाम विभागात सरळसेवा भरती अंतर्गत चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्ती देण्यासाठी १६ लाख रूपयांची मागणी केली. त्यानुसार मांडे यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी नोकरीस लावण्याची विनंती केली. मांडे यांच्या पाच नातेवाईकांचे मिळून १६ लाख ५० हजार रूपये मांडे यांना दिले होते. या प्रकरणी मांडे यांनी पोलीस अधी क्षकांकडे तक्रार केली. त्यावरून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना दिला होता. अधीक्षकांच्या सूचनेनंतर सा. बां. विभागातील वर उल्लेखीत अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
नोकरी लावण्यासाठी १६ लाख घेतल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:35 AM