'लोकशाहीचा खून'; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे रास्तारोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:20 PM2024-01-11T16:20:22+5:302024-01-11T16:24:37+5:30

आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि जनताच खरा काय तो न्याय करेल

Condemnation of the Speaker's decision; Shiv Sena Thackeray faction's Rastraroko movement in Ambad | 'लोकशाहीचा खून'; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे रास्तारोको आंदोलन

'लोकशाहीचा खून'; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे रास्तारोको आंदोलन

अंबड :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी  दिलेल्या निर्णया विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने अंबड येथील बसस्टॅंडसमोर रास्तारोको करण्यात आले. जिल्हा सहसंपर्कप्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आज दुपारी करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी बोलतांना शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख चोथे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, नार्वेकर यांचा कालचा निर्णय हा लोकशाहीचा खून करणारा आहे. भारतीय संविधान पायदळी तुडवून बाळासाहेबांची शिवसेना गद्दारांच्या हाती सोपविण्याचे पाप केले. हा निर्णय केंद्राच्या दबावाखाली घेतला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आलेले नाही. दहाव्या सूचीचा चुकीचा अर्थ लवलेने पक्षांतर व पक्ष फोडण्याचा नविन पायंडा पाडण्याचा प्रकार आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि जनताच खरा काय तो न्याय करेल, अशी टीका चोथे यांनी केली.  रास्तारोको दरम्यान जालना-बीड रोडवर दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या यावेळेस राहुल नार्वेकर यांचा निषेध करुन त्यांच्या प्रतीमेची गाढवावरुन धिंड काढण्यात आली. तसेच महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक भानुदास घुगे नाना, उपजिल्हा प्रमुख हानुमान धांडे, शिवसेना माजी शहरप्रमुख कुमार रुपवते, शहरप्रमुख नंदकिशोर पुंड, घनसावंगी मार्केट कमीटी संचालक महादेवजी काळे, अंबड मार्केट कमीटीचे संचालक जगन दुर्गे, श्रीमंत खटके, दादासाहेब कदम, पंडीत गावडे, रमेश तौर, चंद्रकांत लांडे, इलियास कुरेशी, युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश काळे, रामशेठ लांडे, शाम राठोड, सतिश धुपे, राधाकिसन मैंद, रमेश दादा तौर, भिमराव नेमाने, बाबासाहेब कोल्हे, बळीराम उडदंगे, बद्री शेरे, मुकुंद हुसे, अर्जुन नखाते, बंडु पागीरे, बापुराव गांडुळे, शिवराम भोजने, विजय सोमानी, प्रदिप जोशी, लक्ष्मण आढाव, विजय जाधव, गोवर्धन उगले, लक्ष्मण काकडे, विजय जाधव, रामनाथ जाधव, राजेश राऊत, संभाजी गावडे, उमेश लटपटे, अर्जुन बाबा शेंडगे, संजय मेंडके, रवी इंगळे, संतोष वाघ, रमेश वराडे, सुरेश राजपुत, अशोक खापे, जगन जाधव, अमोल सोनवणे, संतोष बरगे, बळी उडदंगे, रामदास हरिश्चंद्रे, उध्दव घुगे, यशवंत देशमुख, दौलत मडके, रमेश काळे, प्रदीप पवार, सोमनाथ पवार, किशोर दखने, सुदाम काळे, संजय मेंडके, अविनाश खंडागळे, अंकुश पवार, शंकर सांगळे, प्रल्हादसिंग परिहार, किसन काळे, सागर पवार, राधाकिसन डोखळे, धर्मराज जायभाये आदींचा सहभाग होता.

Web Title: Condemnation of the Speaker's decision; Shiv Sena Thackeray faction's Rastraroko movement in Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.