भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे -देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:58 AM2019-01-31T00:58:40+5:302019-01-31T00:58:55+5:30

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन येत्या लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.

Congress workers should be ready for defeat of BJP - Deshpande | भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे -देशमुख

भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे -देशमुख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या शहरातच आपण भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावला आहे. आता मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन येत्या लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले.
जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राजाभाऊ देशमुख यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुधवारी अंबड मार्गावरील पक्ष कार्यालयात त्यांचा जिल्ह्यातील कॉंग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल हे होते. तर माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, अ. भा. कॉंग्रेसचे सदस्य भीमराव डोंगरे, प्रदेश सचिव बाबुराव कुलकर्णी, विजय कामड, माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे, ज्येष्ठ नेते बळीराम शेजूळ, अन्वर बापू देशमुख, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राम सावंत, गट नेते गणेश राऊत, एनएसयुआयचे प्रभारी इम्रान पठाण, महिला कांँग्रेसच्या अध्यक्षा विमल आगलावे, विजय जºहाड, बदर चाऊस, आनंद लोखंडे, शेख शमशू, सभापती जीवन सले, रमेश गोरक्षक, एकबाल कुरेशी, शेख रऊफ परसुवाले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील तीन नगर परिषदांवर कॉंग्रेसचा तिरंगा झेंडा माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांची खरी कसोटी असून, या निवडणूकीत कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी प्रचार यंत्रणा राबवून भाजप- शिवसेनेचा दारुण पराभव करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Congress workers should be ready for defeat of BJP - Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.