विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या विविध माध्यमांचा वापर करून जालना पोलीस दल गंभीर गुन्ह्यांची उकल करीत आहे. इंटरनेटचा पुरेपूर वापर करणाऱ्या जालना पोलीस दलाच्या वेबसाईटवरील माहिती मात्र अद्ययावत होण्याचे नाव घेत नाही. विशेषत: मराठी भाषेची निवड करून ‘कॉन्टॅक्ट अस’ या आॅप्शनवर क्लिक केल्यानंतर चक्क ‘संपर्क अमेरिका’ आणि ‘अबाऊट अस’ मध्ये ‘विषयी एसपी आॅफिस जालना’वर क्लिक केल्यानंतर ‘विषयी अमेरिका’ असा मथळा येतो आणि त्यानंतर पोलीस दलाची माहिती येते. विशेषत: जिल्हा पोलीस दलातील विविध विभागातील आणि ठाणेस्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, या वेबसाईटवर जुन्याच अधिका-यांची नावे आहेत.बदलत्या काळानुरूप गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारांच्या पुढे एक पाऊल टाकत हे गुन्हे थांबविण्यासाठी पोलीस दल काम करीत आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीसह इंटरनेटची विविध माध्यमे पोलीस दलाला उपयुक्त ठरत आहेत.सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचनाजालना जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटवरील सुरक्षितता टीपा या रकान्यात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. आपत्कालीन घटना, महिला सुरक्षा, तरूण गुन्हे, ज्येष्ठ नागरिक सुरक्षा, परदेशी आणि पासपोर्ट, सायबर, आर्थिक, वाहन चोरी, मालमत्ता खरेदी, वाहतूक यासह इतर विषयांवरील सुरक्षिततेबाबत, काळजीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
पोलीस वेबसाईटवर ‘संपर्क अमेरिका’..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:04 AM