शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कॉपीमुक्त अभियान अयशस्वीच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:26 AM

शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कॉपीचा हा आकडा परीक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली नसल्याचे दशर्वित असून, मागील वर्षाच्या तुलनेत या आकड्यात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरी कॉपी मुक्त अभियान अयशस्वीच होत असल्याचे दिसत आहे.दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कॉप्या रोखण्यात परीक्षा मंडळाला अपयश आले आहे. जिल्ह्यातील अनेक केंद्रावर सर्रास कॉपी करताना विद्यार्थी आढळत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान मोडीत निघाल्याचे कॉपी प्रकरणांवरून समोर आले आहे. मंडळाने परीक्षेसाठी जिल्ह्यात ६ भरारी पथक तयार केले होते. या पथकाने जिल्ह्यामध्ये कॉपी प्रकरणांमध्ये कारवाई केलेला आकडा ७७वर गेला आहे.दहावी व बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत ५२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कॉपीमुक्त अभियान अयशस्वी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यासाठी वर्षभर विद्यार्थ्यांना शिक्षक धडे गिरवितात. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचे समोर आले आहे.केंद्रावर असुविधाजालन्यात घेण्यात आलेल्या अनेक परीक्षा केंद्रावर एकाच बाकावर दोन परीक्षार्थी बसविण्यात आले होते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना कॉपी करणे सोपे जात होते.मंठा तालुक्यातील रेणुका विद्यामंदिर येथे मराठी विषयाचा पेपर सुरु असताना परीक्षा केंद्रावर दोन परीक्षार्थी दुस-याच्या नावावर परीक्षा देतांना पथकाला आढळून आले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका, प्रवेशपत्र जप्त करण्यात आल्या होत्या. चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर झाली होती व्हायरलमराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असताना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे प्रश्नपत्रिकेमध्ये सारांश दिलेला असतो तो वाचूनच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठीही विद्यार्थ्यांकडून मराठीच्या पेपरला कॉपी करण्याचे प्रकार उघड झाले. ही मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र