शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोरोना पूर्वीच रेनबोचे नमस्ते अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:23 AM

नमस्ते करीये..स्वस्थ रहिये...रोग मुक्त रहे हिंदुस्तान हे ब्रिदवाक्य घेऊन रोटरी क्लबचाच भाग असलेल्या रोटरी रेनबो क्लबने १५ फेब्रुवारीलाच नमस्ते अभियानाचा प्रारंभ केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नमस्ते करीये..स्वस्थ रहिये...रोग मुक्त रहे हिंदुस्तान हे ब्रिदवाक्य घेऊन रोटरी क्लबचाच भाग असलेल्या रोटरी रेनबो क्लबने १५ फेब्रुवारीलाच नमस्ते अभियानाचा प्रारंभ केला होता. आणि आपले दुर्भाग्य म्हणून की, काय संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसचे थैमान पुढे आले. एक प्रकारे प्रत्येकाला एक चौथा सेन्स असतो, जणू काही हे अभियान सुरू होणे आणि कोरोनाचा हल्ला हा योगायोग म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया डॉ. आरती मंत्री यांनी व्यक्त केली.भारतीय संस्कृती तसेच उर्दू संस्कृतही भेटल्यानंतर एकमेकांना नमस्कार अर्थात स्वागत केले जाते. त्यासाठी भारतीय पध्दतीत दोन्ही हात जोडून एखाद्याचे स्वागत करण्याची जुनीच परपंरा आहे. तसेच उर्दू संस्कृतीतही आदाबर्जे करण्याची पध्दत आहे. या पध्दतीतून एमेकांचे स्वागत करतांना हातात-हात न घेता केवळ दूरवरूनच एकमेकांबद्दलचा आदरभाव व्यक्त केला जातो. आणि तोच संदेश सध्या संपूर्ण जगभर कोरोनाच्या व्हायरसमुळे दिला जात आहे.एकमेकांच्या हातात-हात न मिळविण्याचे निर्देश आरोग्य विभागाने अर्थात डॉक्टरांनीच दिले आहेत.त्यामुळे हे अभियान आम्ही रोटरी क्लबच्या बैठकीत साधारपणे १५ फेबु्रवारीलाच घेण्यात आला. आणि त्याचे जागोजागी स्वागतही झाले.आता कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हात न मिळविण्याच्या सूचना आहेत. या रेनबोच्या उपक्रमाचा आता मोठा लाभ आणि त्याचे महत्वही नागरिकांना पटले असल्याची माहिती रेनबोचे अध्यक्ष विवेक मणियार यांनी सांगितले.अवलंब गरजेचाया नमस्ते इंडियाचा प्रयोग जालन्यात ज्यावेळी प.पू. गोविंद गिरी महाराज आले असता त्यांनाही समजावून सांगण्यात आला.त्यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून याचाच अवलंब जास्तीत जास्त नागरिकांनी करण्याचा सल्ला दिल्याचेही मणियार यांनी सांगितले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी रेनबो क्लबचे सर्व सदस्य पुढाकार घेतल्याची माहितीही मणियार यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोनाRotary Clubरोटरी क्लबSocialसामाजिकHealth Tipsहेल्थ टिप्स